रत्नागिरीत सामाजिक समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी व्याख्यान संपन्न

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
आज (११ एप्रिल) कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले उपस्थित होते. त्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर – संविधान निर्माता” या विषयावर मार्गदर्शन करताना आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेले योगदान तसेच भारतीय संविधान निर्मितीतली त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्याख्यात्यांचा परिचय श्री. कांबळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी उपस्थित शिक्षकवर्ग व प्रमुख व्याख्याते यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास पटवर्धन हायस्कूलचे सर्व शिक्षकवर्ग तसेच उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रीमती मुग्धा पाध्ये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेहनत घेतली. सामाजिक समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



