मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थानचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गौरव

"देहदान व अवयव दान" या कार्याची घेतली विशेष दखल

आबलोली (संदेश कदम) : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्या देहदान व अवयव दान कार्याची दखल घेऊन डेरवण (ता. चिपळूण) येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नाणीजच्या (ता. रत्नागिरी) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थानला गौरवण्यात आले. हा गौरव जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर यांना वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे नेताजी पाटील यांच्या हस्ते वृक्ष भेट आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या देहदान व अवयव दान या उपक्रमाचा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणावर फायदा झाला आहे. तसेच एका व्यक्तीच्या देहदानामुळे व अवयव दानामुळे जवळपास आठ व्यक्तींचे प्राण आपण वाचवू शकतो, असे वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. संतोष कुमार भिसे यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाला संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे, डेरवण वालावलकर महाविद्यालयाचे प्रमुख नेताजी पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!