मुख्य बातमी

नाटेकर-गांधी-कीर कनिष्ठ महाविद्यालयात पोक्सो कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा, रस्ता सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल व नाटेकर कला, गांधी वाणिज्य व कीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने पोक्सो कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा व रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.

या वेळी जिल्हा न्यायाधीश सुमित जोशी, मोटर वाहन निरीक्षक संतोष साळुंखे, प्रवीणकुमार पाटील व ॲड. सुप्रिया सावंत, विधी स्वयंसेवक साक्षी गावडे उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर व पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी केले.

कायद्याचे ज्ञान हे प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे याच उद्देशाने मार्गदर्शक न्यायाधीश सुमित जोशी यांनी गुन्हेगारी जगतातली अनेक उदाहरणे देऊन उत्तम आयुष्यासाठी कायद्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेणे अत्यावश्यक आहे, हे समजून सांगितले. ॲड. सुप्रिया सावंत यांनी पोक्सो कायदा म्हणजे काय? कायद्यातील तरतुदी आदी बाबी विद्यार्थ्यांसमोर ठेवल्या. रस्ता सुरक्षा संदर्भात मोटर वाहन निरीक्षक संतोष साळुंखे व प्रवीणकुमार पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पटवर्धन हायस्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चव्हाण यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!