कोकणमुख्य बातमी

शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (२९ मार्च), रविवार (३० मार्च) व सोमवार (३१ मार्च) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ३६ हजार ४५९ वीज ग्राहकांकडे ५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार ६३६ वीज ग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ हजार ८२३ वीज ग्राहकांकडे ३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!