रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता
चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे रत्नागिरीत नुकतीच जिल्हास्तरीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे विजेतेपद वरद पेठे या युवा बुद्धिबळपटूने प्राप्त केले. वरदने संपूर्ण स्पर्धेत ८ फेऱ्यांमध्ये अपराजित रहात ७.५ गुणांसह निर्विवाद प्रथम क्रमांक पटकावला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीतील सामन्यांत साहस नारकरने रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई विरुद्ध विजय संपादन केला तर यश गोगटे याने प्रवीण सावर्डेकर विरुद्धचा डाव जिंकला. साहस व यश दोघांचेही प्रत्येकी ७ गुण झाले पण सरस टाय ब्रेक गुणांवर साहसने उपविजेतेपद प्राप्त केले व यशला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील इतर पारितोषिक प्राप्त खेळाडू पुढीलप्रमाणे.
खुला गट क्रमांक चार ते दहा : अनंत गोखले , सोहम रुमडे , सौरिष कशेळकर , आयुष रायकर, प्रवीण सावर्डेकर, साईप्रसाद साळवी, लवेश पावसकर.
विविध वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त खेळाडू असे : १५ वर्षांखालील वयोगट – ओम उत्तेकर, श्लोक घाग, आर्या पळसुलेदेसाई. १३ वर्षांखालील वयोगट- अथर्व साठे , अंकुश कौरवार , अद्वैत शानभाग. ११ वर्षांखालील मुले – अर्णव गावखडकर , रुद्र जोशी , विराज बनसोड. ९ वर्षांखालील वयोगट – आरव निमकर, पार्थ बेल्हेकर, रूपक चाचले. ७ वर्षांखालील वयोगट – श्रेष्ठ दीक्षित, चैतन्य धुपकर, आस्तिक कुलकर्णी. वरिष्ठ वयोगट – विवेक जोशी, गिरिश भिडे, नरेंद्र चोगले. महिला – सई प्रभुदेसाई, सानवी दामले, मृण्मयी दांडेकर. दिव्यांग खेळाडू – मोहसीन सय्यद, कुणाल मयेकर.
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेला एकूण २५ फिडे मानांकित खेळाडूंसह संपूर्ण जिल्ह्यातून १७० पेक्षा अधिक बुद्धिबळपटूंचा विक्रमी सहभाग लाभला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे प्रेसिडेंट डॉ. संदीप करे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी रोटे. सीताराम सावंत (सचिव), रोटे. विनायक निकम, रोटे. अस्मिता चोप्रा, रोटे. प्रवीण लाड, रोटे. स्वप्ना करे, रोटे. वामन सावंत, रोटे. प्रदीप साळुंखे, स्पर्धा स्पर्धा समन्वयक रोटे. अमर आयरे, स्पर्धा प्रमुख रोटे. जयेश दिवाणी, शर्वरी लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
लांजा येथील फिडे आर्बीटर प्राची मयेकर-सुर्वे यांनी स्पर्धेत प्रमुख पंचाची कामगिरी पार पडली. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांनी स्पर्धेचे नियोजन केले. उपेंद्र खेर, अद्वैत काळे, चैतन्य भिडे यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले.



