मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बुधल (गुहागर) समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह सापडले

गुहागर : तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा समुद्राच्या पाण्यात वाहून जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेल्या दोघांचा संबंध चिपळूणमधील गोवळकोट परिसराशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही बुधल बीचवरील खडकाळ भागात किंवा समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. समुद्राला आलेल्या लाटांचा वेग आणि पाण्याची खोली यांचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

 

दरम्यान, बुधल गावातील ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. तसेच पोलीस आणि संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत तातडीने मदतकार्य व पुढील कार्यवाहीसाठी यंत्रणा घटनास्थळी बोलावून घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. मृतांची ओळख आणि या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!