मुख्य बातमी

“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी रेन रनचे आयोजन

रत्नागिरी : “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमास पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अंमली पदार्थमुक्त रत्नागिरीसाठी नागरिकांना मार्गदर्शन करून नशामुक्त समाजाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. तसेच, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील उत्कृष्ट पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रत्नागिरी जिल्हा ‘ड्रग्स फ्री’ करण्याचा निर्धार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!