मुख्य बातमी

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाची मुंबई कोकण झोन स्पोर्ट्स कमिटी आणि नवनिर्माण शिक्षण संस्थचे एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा (मुले-मुली) २०२६ चे उद्घाटन १ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले.

महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम आणि मुंबई विद्यापीठ कोकण झोन स्पोर्ट्स कमिटीचे सचिव शशांक उपशेट्ये यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, एस. एम. जोशी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्रमुख ऋतुजा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, प्रा. सुकुमार शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रा. सुशील साळवी यांनी केले. त्यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. रत्नागिरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच स्पर्धा आयोजित होत आहे, असे ही त्यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी आर्बिटर म्हणून रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन विवेक सोहनी, उपेंद्र खरे, साहस नारकर काम करणार आहेत. त्याच्यासह राम कदम, श्रीमती निधी पडवळ आणि मंगेश सकपाळ यांचीही उपस्थिती होती.

१ ते २ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत ३० महाविद्यालयांतील १२० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षदा शिऊडकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!