मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी ‘मनसे’मध्ये प्रवेशाचा धडाका सुरूच

अनेक महिलांचा जाहीर प्रवेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनखाली आणि महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली महिला शहर सचिव संपदा राणा यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी शहरातील अनेक महिलांचा ‘मनसे’मध्ये ८ एप्रिल रोजी जाहीर पक्ष प्रवेश झाला.

गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’ने रत्नागिरी शहरातील अनेक गोष्टींवर आवाज उठवला होता. अनेक यशस्वी आंदोलने केली होती. त्या गोष्टींनी भारावून या महिलांनी ‘मनसे’मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

आगामी काळात मनसेचे इंजिन असेच रत्नागिरी शहरात सुसाट धावेल अजूनही काही पक्ष प्रवेश होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सांगितले.

याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!