आरोग्यमुख्य बातमी

प्रसिद्ध काचबिंदू तज्ज्ञ डॉ. प्रियांका सिंग यांचा सल्ला घेण्याची संधी रत्नागिरीत

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे खास सल्ला शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण काचबिंदू (ग्लॉकोमा) हा असा आजार आहे जो कुठलेही ठोस लक्षण न देता हळूहळू तुमची दृष्टी हिरावून घेतो. त्यामुळेच तो “सायलेंट किलर” म्हणून ओळखला जातो. एकदा दृष्टी गेली, की ती परत येत नाही म्हणून वेळेत निदान व उपचार हीच त्यावरची एकमेव गुरुकिल्ली आहे. याच उद्देशाने इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे १९ एप्रिल रोजी एक खास शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात देशभरात प्रसिद्ध असलेल्या काचबिंदू तज्ञ डॉ. प्रियांका सिंग यांचा प्रत्यक्ष सल्ला घेण्याची संधी मिळणार आहे.

डॉ. प्रियांका सिंग या ग्लॉकोमा तज्ञ असून त्यांनी मुंबईतून MBBS आणि DNB नेत्ररोग (ऑप्थल्मोलॉजी) तसेच चेन्नईमधून ग्लॉकोमा फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यांना सुमारे ७ वर्षांचा अनुभव असून त्या सध्या इन्फिगोमध्ये कार्यरत आहेत. डॉ. सिंग यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून, त्यांचा अनुभव आता आपल्या रत्नागिरीत लोकांना मिळणार आहे, तेही एका दिवसासाठी.

४० वर्षांपुढील लोकांसाठी हा सल्ला अतिशय गरजेचा आहे. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 9372766504 या क्रमांकावर संपर्क साधून आपली पूर्व नोंदणी करा आणि संधीचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!