मुख्य बातमी
शिरगाव येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने रत्नागिरी-गणपतीपुळे मार्ग काही काळासाठी ठप्प
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेबाबत नाराजी

रत्नागिरी : तालुक्यातील परटवणे शिरगांव- गणपतीपुळे मार्गावरील गांजुर्डे येथील मशिदीजवळ भलेमोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे शिरगांव, साखरतर आणि गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला होता. सुमारे तासाभरानंतर हे झाड तोडून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली.


रस्त्यावर झाड पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एक तासाहून अधिक काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती तासाभराच्या प्रयत्नानंतर शिरगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. या वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र कुठे दिसून न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.


