मुख्य बातमी
खेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या शिवराज्याभिषेक दिन

खेड : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उद्या (६ जून) शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. आयटीआय मधील प्रशिक्षणार्थीमध्ये चांगले विचार रुजविण्यासाठी सामाजिक सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यात्याचे प्रभोधनपर व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात सकाळी १० वाजता एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.



