आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता लाभार्थ्यांना २० जून रोजी होणार वितरित

ई-केवायसी व आधार सीडिंग करण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील 20 वा हप्ता लाभार्थ्यांना 20 जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण १ लाख ७२ हजार ४५७ नोंदणीकृत लाभार्थी असून, यामधील ई- केवायसी नसलेले ३८८०, बँक खाते आधार संलग्न नसलेले- ७१६९ लाभार्थी प्रलंबित आहेत. ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO), कृषी सहाय्यक आणि सामाजिक सुविधा केंद्रे (CSC) नियुक्त करण्यात आली आहेत. तरी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या संपर्कात राहून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

शासनाच्या Agristack योजनेअंतर्गत PM किसान लाभार्थ्यांसाठी फॉर्मर आयडी तयार करणे आवश्यक असून, आतापर्यंत 1 लाख 25 हजार 740 लाभार्थ्यांनी फॉर्मर आयडी तयार केला असून अद्यापही ४६ हजार ७१७ लाभार्थी प्रलंबित आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. तसेच CSC केंद्र

आणि कृषि विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून नोंदणी करावी. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि Agristack योजनेंतर्गत फार्मर आयडी तसेच ई-केवायसी व आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी कृषि विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी / कर्मचारी तसेच सामायिक सुविधा केंद्र (CSCs) यांचेशी संपर्क साधून आपली प्रलंबीतता पूर्ण करावी.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी ई-केवायसी, आधार सीडिंग व फॉर्मर आयडीची पूर्तता 20 जूनपूर्वी व्हावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!