आरोग्यक्रीडामुख्य बातमी

युवा तायक्वांदोच्या वतीने योग दिन साजरा

रत्नागिरी : तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन संलग्न असलेल्या रत्नागिरीतील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आज (२१ जून) साळवी स्टॉप-नाचणे येथील ओम साई मित्र मंडळ सभागृहात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात योग प्रशिक्षिका शारदा केदारी यांनी योगाचे महत्त्व पटवून सांगतानाच सर्व तायक्वांदो खेळाडू, पालक, प्रशिक्षक यांच्याकडून योगाचा सराव करून घेतला. उपर्जना कररा हिने योगाविषयी शाब्दिक माहिती सांगितली. अति उत्साहाने झालेल्या या कार्यक्रमात युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते योग प्रशिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

प्रशिक्षक राम कररा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा योग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षका सौ. शशीरेखा कररा, गुरुप्रसाद सावंत, अथर्व भागवत, मधुर धुळप यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!