मुख्य बातमी

शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयात शाहू महाराज जयंती उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय खरवते – दहिवली येथे सामाजिक न्याय व समता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र भागडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर व सामाजिक कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!