आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जि. प. केंद्र शाळा पाचेरी आगर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते – दहिवली (ता. चिपळूण) महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पाचेरी आगर येथे ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षदिंडी, वृक्षारोपण तसेच वकृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साक्षी हुमणे यांनी भुषविले. यावेळी सपना हुमणे, मुख्याध्यापक ऋषिकांत पवार, उपशिक्षिका पल्लवी पवार, शिवाजी साळवे, विठ्ठल हांडे, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ पावरा, कृषी दुत नितिन पाटील, अम्मार चिकटे, कार्तिक गवई, हाजिम अमल, मोहम्मद बिलाल, उमैर मणियार यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कृषीदूत नितिन पाटील यांनी कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!