मुख्य बातमीशैक्षणिक

“जीजीपीएस”मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : हिंदू संस्कृतीची परंपरा जपत प्रत्येक सण आणि उत्सव आनंदाने साजरा करणाऱ्या “जीजीपीएस”च्या ‘श्री स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाने आपल्या चिमुकल्यांसोबत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानुसार विद्यार्थी विविध गुरु-शिष्यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता, सावित्रीबाई फुले व विद्यार्थिनी, द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा गुरु शिष्यांच्या विविध वेशात मुले तयार होऊन आली होती; जे आजच्या पिढीसाठी गुरु-शिष्य परंपरेचे आदर्श आहेत. गुरु-शिष्य परंपरा सांगणाऱ्या विविध कथा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही भाषणे दिली,कथा सांगितल्या तसेच सुंदर असे गाणेही गायले. गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी गुरु म्हणून शिक्षकांविषयीचा आपला आदर व्यक्त केला.

प्री-प्रायमरी विभागाच्या प्रमुख सौ.शुभदा पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली पाटणकर प्राथमिक विभागाच्या सौ.अपूर्वा मुरकर,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!