मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पाचेरी सडा, पारेवाडी येथे वादळी पावसाने घराचे नुकसान

आर्थिक मदतीसाठी दानशूर व्यक्तींची गरज

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील पाचेरी सडा, पारेवाडी येथील गरीब कुटुंबातील राजेश शंकर डिंगणकर यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे भलेमोठे झाड कोसळले असून घराचे फार मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी टळली असली तरी राजेश शंकर डिंगणकर या गरीब कुटुंबातील व्यक्तीला सध्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

त्यांच्या घराचा तात्काळ पंचनामा ग्रामसेवक विश्वनाथ पावरा, तलाठी ए. बी. बरकडे, पोलीस पाटील शंकर डिंगणकर यांनी तात्काळ पंचनामा केला आहे या पंचनाम्यात अंदाजे ३० हजार ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी गाव मंडळाचे अध्यक्ष संतोष डिंगणकर, उपाध्यक्ष दामोदर डिंगणकर, माजी सरपंच संतोष आंब्रे, सागर डिंगणकर आदी उपस्थित होते. शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आताच्या घडीला दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून राजेश डिंगणकर यांना या प्रसंगातून सावरणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!