मुख्य बातमी

रत्नागिरीच्या रेल्वेस्टेशनवरून मनोरुग्णाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : गुरुवारी रात्री ९.४५ च्या दरम्यान एक व्यक्ती रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या बिल्डिंगच्या छतावर उभी असल्याचे काहींनी पहिले आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या घटनेबाबत ताबडतोब शीघ्र कृती दलाला (RPF) कळविण्यात आले. “आरपीएफ”कडून त्या व्यक्तीला खाली उतरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.

त्याच वेळी ही माहिती रत्नागिरी पोलिस ठाण्यात ही कळविण्यात आली आणि वेगाने सूत्र हलली. रत्नागिरी पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल होताच अग्निशमन दलाची टीम ही या ठिकाणी येऊन पोहचली. “आरपीएफ”, पोलिस व अग्निशमचे जवान या सर्वांकडून टेरेसवरच्या व्यक्तीला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही स्थानिक लोकांचीही मदत घेण्यात आली. तीन तासाच्या थरारक प्रयत्नांनंतर या व्यक्तीला खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर समजले ही व्यक्ती मनोरुग्ण आहे. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!