मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

टेरवच्या (चिपळूण) सुमन विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

सेवा सहयोग फाउंडेशनचा (मुंबई) प्रेरणादायी उपक्रम

चिपळूण : जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये नुकतेच सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई, यांच्या सौजन्याने इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या ७९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी दफ्तर, ८ लाँग नोट बुक, आलेख वही व कंपास बॉक्सचा समावेश होता.

शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, फौंउडेशनचा सेवाभाव समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे. फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यातील तसेच महाराष्ट्र व देशातील खेड्यापाड्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसून आली.

जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने सेवा सहयोग फाऊंडेशनचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा हा उज्ज्वल आदर्श भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उजळवेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

ही शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अजित कदम त्याचप्रमाणे सुधाकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मंदार सुर्वे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!