मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जनता विद्यालय आंगवली शाळेचे एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश

संगमेश्वर : तालुक्यातील आंगवली विकास मंडळ, मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली या शाळेने एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ही परीक्षा एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून यामधून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची सुवर्णसंधी मिळते.

यावर्षी एकूण १८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तन्वी संतोष बेटकर, आराध्य अनिल गोरुळे,  नेहा सुदेश पांचाळ, श्रुती संतोष भिसे, शुभम दीपक घाग, दिशा तुकाराम उंडे, दितेश दीपक भिसे, मृणाल रवींद्र लाड, आर्या सुनील सरफरे आणि स्वरा अमोल प्रभावळकर या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

या विद्यार्थ्यांना सौ. एस. बी. चिंचवलकर यांनी जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन करून हे यश मिळवून दिले. श्री. काजरेकर व सूरज जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. पालकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पुढील काळातही अशा स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होऊन शाळेचे नाव उंचवावे, असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!