मुख्य बातमी
एकादशी कीर्तन सेवा उपक्रम; रविवारी कीर्तनाचे आयोजन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशी कीर्तन सेवा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमाअंतर्गत अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे रविवारी (२३ ऑगस्ट) रोजी ह.भ.प. मयुरी जोशी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या एकादशी कीर्तनसेवा उपक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ व रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांनी केले आहे. हे कीर्तन अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी या ठिकाणी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत संपन्न होईल. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस व रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांनी केले आहे.



