मुख्य बातमी

कुसुमताई सहकारी पतसंस्था ठेव वृद्धी मास जाहीर

रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्था प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १ जुलै ते १ ऑगस्ट असा ठेव वृद्धी मास जाहीर केला असून आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. या सवलतीच्या व्याजदराचा फायदा ठेवीदारांनी घ्यावा, असे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहेत.

ठेव वृ‌द्धी मासामध्ये ५ कोटी ठेवी संकलीत करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला असून १ वर्षासाठी ९ टक्के व्याजदर व ३ वर्ष मासिक त्रैमासिक व्याज ८ टक्के व ३ वर्ष पुनर्गुतवणूक ठेव व्याजदर ७.५० टक्के ठेवीदारांना मिळणार आहे. संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संस्थेकडे रु. ५० कोटीच्या ठेवी आज पर्यंत जमा झाल्या आहेत.या ठेव वृद्धी मासात ७५ कोटीचे उ‌द्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास संचालकांना असून त्या दृष्टीने सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजेंट नियोजन करीत आहेत. या संस्थेमधे सोनेतारण कर्जासह जामीनतारण व वाहनतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

पतसंस्थेमध्ये दररोज ७ लाख पिग्मी जमा होत असून आर.डी. किंवा बचत खाती च्या माध्यमातून ठेवी जमा होत आहेत. संस्थेवरील विश्वास यामुळे अधिक दृढ होत आहे. सर्वत्र सोनेतारण कर्जाची वाढती मागणी लक्ष्यात घेता गुंतवलेल्या ठेवीचे योग्य नियोजन संस्था स्तरावरून करण्यात येत आहे. संस्थेचे एकूण भाग भांडवल ७७ लाख ६५ हजार ठेवी ५० कोटी, कर्ज ४२ कोटी, नफा ७२ लाख वसुली ९९ टक्के आहे. गेल्यावर्षीपर्यंत ५० कोटीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करताना 100 कोटी जमा करण्याचा संकल्प संचालक मंडळाचा आहे. या सर्व प्रवासात सर्व ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार यांनी मोलाचे सहकार्य केले. पतसंस्थेने विश्वासार्हता जपली असून ग्राहकांनी आपल्या ठेवी संस्थेमधे गुंतवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नाना शिंदे व उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!