मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे गौरी गणपती सणानिमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द येथील आंबेकरवाडी येथे गौरी गणपती सणानिमित्ताने रॉयल प्रतिष्ठान आंबेकरवाडी यांच्या सौजन्याने आंबेकरवाडीमधील मुला-मुलींच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा उत्साहात आणि जल्लोषात झाली.

या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत लहान मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यात त्यांनी उत्कृष्टपणे आपली कला सादर केली. या सर्व स्पर्धकांना रॉयल प्रतिष्ठान आंबेकरवाडीतर्फे पोलीस पाटील वासंती आंबेकर, गंगाराम आंबेकर, मनोहर आंबेकर, नितीन आंबेकर, योगेश आंबेकर, प्रकाश आंबेकर, हेमंत आंबेकर, स्वीकार आंबेकर, राजेश आंबेकर, शिशिर आंबेकर, जयेश आंबेकर,सतीश आंबेकर, प्रविणा आंबेकर, प्रणाली आंबेकर, अश्विनी आंबेकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला आंबेकरवाडीतील ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ आणि रॉयल प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!