अलिबाग समुद्रावरील पथदीप अनेक दिवस बंद

अलिबाग (राजेश बाष्टे) : नगरपालिका हद्दीतील समुद्रकिनारी असलेले पथदीप (स्ट्रिटलाईट) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळी समुद्रावर येणाऱ्या नागरिकांना वॉक करताना तसेच जे पर्यटक अलिबागमध्ये येत असतात त्यांना काळोखात फिरणे अडचणीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे वयोवृध्द नागरिक रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात. लाईट नसल्यामुळे त्यांचाही अपघात होऊ शकतो. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी अलिबागतर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष रोशन भगत, अलिबाग दक्षिण तालुका अध्यक्ष अशोक वारगे व अलिबाग भाजपा युवा नेते स्वप्निल गाडे आदी उपस्थित होते. अलिबाग नगरपालिकेतर्फे हे निवेदन वीज विभागातील श्री. कुंडल यांनी स्वीकारले.
बंद असलेले पथदीप ताबडतोब चालू करून घ्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


