कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

रुद्र सेवा फाऊंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप

रायगड : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रुद्र सेवा फाऊंडेशन डोंबिवली यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा गुढवण, (ता. कर्जत) येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गुढवण व रामाची वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुंदर स्वागतगीताने झाली. त्यानंतर निलेश ठोंबरे आणि इतर शिक्षक वर्गाने फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

संस्थेचे सचिव राजेंद्र वाळके यांनी संस्थेची स्थापना व उद्देश याची थोडक्यात माहिती दिली. संस्थेच्या इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. “शिक्षण हीच प्रगतीची खरी वाट” हा संदेश देण्यात आला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरला.

शेवटी दोन्ही शाळांच्या शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने फाऊंडेशनचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी रुद्र सेवा फाउंडेशन चे पदाधिकारी व सदस्य तसेच दोन्ही शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!