मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीकडून दहा उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर : नगरपंचायतीच्या नगरसेवक पदासाठी आज (१५ नोव्हेंबर) सहाव्या दिवशी महाविकास आघाडीकडून १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन बाईत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पद्ममाशेठ आरेकर, शाबिर भाई, जयदेव मोरे, सिद्धिविनायक जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक १ मधून समीर बागकर, प्रभाग क्रमांक ३ मधून रिद्धी घोरपडे, प्रभाग क्रमांक ६ मधून रिद्धी रहाटे, प्रभाग क्रमांक ७ मधून प्रगती वराडकर, प्रभाग क्रमांक ८ मधून रिया गुहागरकर, प्रभाग क्रमांक ९ मधून वैशाली मालप, प्रभाग क्रमांक १० मधून राजेंद्र आरेकर, प्रभाग क्रमांक १२ मधून नीता गुरव, प्रभाग क्रमांक १६ मधून राज विखारे, प्रभाग क्रमांक १७ मधून श्रिया मोरे या दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज गुहागर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!