महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा दौरा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) व ज्योतिराम चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवारी (२ जून) रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. मंगळवारी (३ जून) सकाळी १० ते ११ वाजता जिल्हाधिकारी रत्नागिरी, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्यातितील प्रांताधिकारी यांच्या समवेत वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जात समुहाबाबत बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह). सकाळी १० ते दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव या जातसमुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व सुनावणी (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह). दुपारी १२.३० वाजता भोजन. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजता वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जात समुहाची जिल्ह्यामध्ये क्षेत्रपहाणी. सायंकाळी ६ वाजता सिंधुदुर्गकडे रवाना.



