आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

उपकेंद्र धाऊलवल्ली येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा

राजापूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे अंतर्गत उपकेंद्र धाऊलवल्ली येथील हायस्कूलमध्ये २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व मुलांना क्षयरोग आजाराबाबत माहिती देऊन प्रतिज्ञा घेण्यात आली. याबरोबरच कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत तसेच जलजन्य आजार, किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला धाऊलवल्ली हायस्कूलच्या मुख्याध्यापक श्रीमती सरोज हरचकर, केंद्र प्रमुख श्री. जाधव, सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी धाऊलवल्लीचे सीएचओ नागेश गेजगे, एमपीडब्ल्यू मनोज गुरव, एएनएम सायली जाधव, आशा शीतल पावसकर, प्राजक्ता चव्हाण, मदतनीस मेघा राणे उपस्थिती होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!