क्रीडामुख्य बातमी

डेरवण येथे २५ मेपासून जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी : जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे २५ मे ते १५ जून या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिम्नॅस्टिक या खेळाचे निशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिविर एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे दि. २५ मे ते १५ जून या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत व आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी उर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे निशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये मुलांना फ्लोअर एक्सरसाईज, पोगेल हॉर्स, स्टील रिंग्स, टेबल बोल्ट, पैरलल बारी व होरीझोटल बार तर गुलींना फ़्लोअर एक्सरसाईज, टेबल बोल्ट, बैलगसिंग विंग या उपकरणाची तसेच त्यावरील मूलभूत कौशल्याची ओळख प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. जिम्नॅस्टिक्स उन्हाळी प्रशिक्षण शिविरात सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण शिबिराबाबत सविस्तर माहितीसाठी सचिन मांडवकर (८४०८८६५८७०) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!