शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे अतिशय गुंतागुंतीची आतड्यांची यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दत्ताराम धावडे यांना १५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान पोटदुखी व पोटाचा घेर वाढून त्रास होत असल्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या पोटाच्या टेस्ट केल्या असता त्वरीत शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले; मात्र रुग्णास उच्चरक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याने शस्त्रक्रिया करणे अधिक जोखमीचे ठरणार होते.
अशावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी मधील जनरल, लेप्रोस्कोपी अँड एंडोस्कोपीक सर्जन तथा शल्यचिकिस्ताशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोहर कदम यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, भूलतज्ज्ञ डॉ. विनोद कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय गुंतागुंतीची आतड्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून रुग्णाचे प्राण वाचवले. रुग्ण श्री. गावडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



