पूर्णगड किल्लेकरवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड येथे जय हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी यांच्या वतीने हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडेल. त्यानंतर सकाळी ९ वाजता अभिषेक, १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होईल. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत इन्फिगो हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता भजन, तर ७ वाजता आरती होईल. त्यानंतर रात्री १० वाजता रत्नलेखा, मुंबई निर्मित “आता तरी हो म्हण…” ही नाट्यकलाकृती सादर केली जाईल.
या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पूर्णगड यांनी केले आहे.



