राजापुरात पुराच्या पाण्याने वेढणारे वीज खांब व रोहित्रे स्थलांतरित करावे
आमदार किरण सामंत यांच्या सूचना

राजापूर : पावसाळी तीव्र हंगामात शहरात निर्माण होणा-या पूर स्थितीप्रसंगी महावितरणचे काही रोहित्र कमी उंचीमुळे पाण्यात बुडत असल्याने व काही वीज खांब पुराच्या पाण्यात त्यामुळे वीजपुरवठा सुरू राहण्यात अडथळे निर्माण होतात. दरवर्षी अशा पुराच्या पाण्याने वेढणारी रोहित्रे व वीज खांबांचे सर्वेक्षण करून ते लगतच्या सुरक्षित भागात हलवण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर यांना दिल्या आहेत. याबाबतची लेखी मागणी ओबीसी समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी आ. सामंत यांच्याकडे केली होती.
अशी पुराच्या पाण्याने क्षतीग्रस्त होणारी शहरातील विद्युत रोहित्रे व वीज खांब यांचे सर्वेक्षण नगर पालिकेचा विभाग व महावितरणचे शहर कार्यालय यांनी संयुक्तपणे करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून जवाहर चौक व मुन्शीनाका येथील रोहित्राचा व वैकुंठभूमी रस्त्यावरील वीज खांबांचा समावेश आहे.
राजापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नदीपात्रालगतच्या भागात काही रोहित्रे व बीज खांब आहेत. शहरात तीव्र पावसाळ्यात दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पूरस्थिती असते. त्या काळात ही रोहित्रे व वीजखांब पुराच्या पाण्याने वेढली जात असल्याने वीजपुरवठा खंडित ठेवावा लागतो. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पुराच्यावेळी पूर ओसरेपर्यंत त्यामुळे काहीच हालचाल करता येत नाही. शहरात पूरस्थिती असताना नागरिक, व्यापारी हवालदिल असतात. त्यात वीजपुरवठा खंडित ठेवावा लागत असल्याने जनजीवन आणखीनच कोलमडून पडते.
ग्रासाठी दरवर्षी महापुराप्रसंगी क्षतीग्रस्त होत असलेली रोहित्रे उंच ठिकाणी उभारावीत व नदीपात्रालगत असलेले व पुराच्या पाण्यात जाणारे काही वीज खांब लगतच हलवावे, अशी मागणी श्री. शिवलकर यांनी केली होती, महावितरणच्या कर्मचान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखिल हे काम यंदाच्या पावसाळी हंगामापूर्वी करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. याची तत्काळ दखल घेत आ. सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.


