देवडे (संगमेश्वर) येथे १५ ते १७ मेदरम्यान महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव
सामाजिक, धार्मिक, क्रीडा आणि शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव देवडे (ता. संगमेश्वर, व्हाया, साखरपा) येथे देवडे भीमज्योत हितवर्धक सेवा संघ, मुंबई/ ग्रामीण आणि संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने १५ मे ते १७ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
१६ मे रोजी सकाळी १० वाजता साखरपा आरोग्य केंद्र आणि डेरवण हॉस्पिटल स्वामी समर्थ नेत्र रुग्णालयाच्या (ता. चिपळूण) सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी ७ वाजता कोकण ताशे स्पर्धा- २०२५ या कोकणातल्या वाद्य परंपरेशी आधारित या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम पारितोषिक ११ हजार १११ आकर्षक चषक व सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ आकर्षक चषक व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक ५ हजार ५५५ आकर्षक चषक व सन्मानपत्र व सर्व सहभागी संघाना सन्मानपत्र समारंभपूर्वक देण्यात येईल. या स्पर्धेची प्रवेश फी १ हजार रुपये बंधनकारक राहील. प्रवेश फी नंबर ९८९२२७०३३८ या ऑनलाइन पे नंबरवर संपर्क साधून जमा करावी.
१७ मे रोजी सकाळी ११ वाजता होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे. पहिले बक्षीस सोन्याची नथ व प्रमाणपत्र दुसरे बक्षीस सेमी पैठणी व प्रमाणपत्र व सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू दिली जाईल. अधिक माहितीसाठी खजिनदार प्रदीप प्रकाश कांबळे (९८९२२७०३३८) किंवा सरचिटणीस अशोक बबन कांबळे (९९६९५१४८९१) या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई कार्यकारिणीचे अध्यक्ष, सुभाष कांबळे, ग्रामीण कार्यकारिणीचे अध्यक्ष, सिद्धार्थ कांबळे, महिला कार्यकारणीच्या अध्यक्षा सौ. वैष्णवी कांबळे मेहनत घेत आहेत.



