महाराष्ट्रातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या “कॅफे दुर्गा”ची शाखा रत्नागिरीत सुरू
कोकणातील पहिलीच शाखा; गुणवत्ता आणि दर्जेदार सेवेसह विविध पदार्थांची रेलचेल

रत्नागिरी : पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खवय्यांच्या पसंतीस उतरलेले, कॅफे दुर्गा (Cafe Durga) आता रत्नागिरीच्या सेवेसाठी सुरू झाले असून, या कॅफेच्या माध्यमातून रत्नागिरीतील अस्सल खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जाणार आहेत. शहरातील आरोग्य मंदिर ते मजगाव लिंक रोडवर (कॅनरा बँक शेजारी) सुरू झालेली कॅफे दुर्गाची ही कोकणातील पहिलीच शाखा आहे.

या कॅफेमध्ये बसण्यासाठी प्रशस्त जागा असून संपूर्ण कॅफे वातानुकूलित व मोहक अंतर्गत रचना करण्यात आली आहे. कॅफेमध्ये कॉफी, कोल्ड कॉफी, पोहे, सांबार, चटणी, डोसा, बुर्जी, नूडल्स, मिसळ, फ्राईड राईस यांसह इतर महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. कॅफे दुर्गा उच्च प्रतीचे पदार्थ आणि सेवा पुरवतो, ज्यामुळे ग्राहकांची आवड वाढत आहे.

ही एक फ्रँचायझी असलेली कॉफी शॉप आणि कॅफे चेन आहे, जी भारतात लोकप्रिय आहे. कॅफे दुर्गाने गेल्या १८-१९ वर्षांत १० पेक्षा जास्त शहरे आणि ३ राज्यांमध्ये ११०पेक्षा जास्त शाखा उघडल्या आहेत. कॅफे दुर्गाची वेबसाइट फ्रँचायझी मॉडेलद्वारे कार्य करते. ज्यामुळे अधिक लोक कॅफे दुर्गामध्ये सामील होऊ लागले आहेत आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी मदत होत आहे.
रत्नागिरीमध्ये ही शाखा नुकतीच सुरू झाली असून, दिवसेंदिवस हा कॅफे खवय्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. अन्नपदार्थांची चव, दर्जा, ग्राहकांना दिली जाणारी उत्तम सेवा यांमुळे हा कॅफे रत्नागिरीतील अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे.



