मुख्य बातमी

रत्नागिरी शहर भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती ३१ मे रोजी असून त्यानिमित्त रत्नागिरी भाजपाच्यावतीने व शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे पुरस्कृत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर मर्यादित खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी २६ मेपर्यंत आपले निबंध जमा करायचे आहेत.

या स्पर्धेसाठी विषय : 1) देशभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श प्रशासक. 2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान.

स्पर्धेत भाग घेवू इच्छूणार्‍या स्पर्धकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात निंबंध कागदाच्या एका बाजुने लिहावा. निबंधाची शब्द मर्यादा १००० ते १२०० शब्द असावी, स्पर्धकांनी स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर कागदावर लिहावा,स्पर्धकांनी आपले निबंध २६ मे २०२५ पर्यंत ‘अ‍ॅप्पल ब्लॉसम, रामआळी,रत्नागिरी’ किंवा भाजप कार्यालय प्रमोद महाजन क्रीडांगण शेजारी आठवडा बाजार रत्नागिरी. या पत्त्यावर पोहोचतील असे पाहावे, स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना कळविण्यात येईल.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम २ हजार २२२ रुपये आकर्षक चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम १ हजार ५५५ रुपये, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकाला रोख रक्कम १ हजार १११ रुपये आकर्षक चषक व प्रमाणपत्र त्याचप्रमाणे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २७ मे रोजी सायंकाळी ५. ३० वाजता भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय प्रमोद महाजन क्रीडांगण शेजारी येथे होईल. या वेळी स्पर्धकांनी आपले कुटुंब, नातेवाईक तसेच मित्रपरिवारासह उपस्थित राहावे आणि अधिक माहितीसाठी 9422432656, 9158511517, नीलेश आखाडे (9860625740) यांच्याही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!