जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शहराजवळील शिरगाव येथे दामले कुटुंबियांनी जतन केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खोलीची पाहणी करून त्यांना अभिवादन केले.


“स्वातंत्र्य वीर सावरकर” हे रत्नागिरीमध्ये असताना रत्नागिरी शहराजवळील शिरगाव येथील दामले यांच्या घरात राहत होते. त्यांनी ज्या खोलीत वास्तव्य केले होते ती खोली दामले कुटुंबाने ऐतिहासिक खजिना म्हणून जतन केली आहे. याच ऐतिहासिक खोलीला आज (२८ मे) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी भेट दिली व दामले कुटुंबियांसोबत चर्चा केली.
यावेळी त्यांनी शहरातील गाडीतील येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तसेच जवळच असलेल्या पतित पावन मंदिराला भेट दिली.




