रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ग्लॉकोमा तपासणीसाठी विशेष शिबिर
सुप्रसिद्ध ग्लॉकोमा तज्ज्ञ डॉ. प्रियांका सिंग करणार तपासणी

रत्नागिरी : डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी ग्लॉकोमा या ‘मूक आजाराची’ वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ग्लॉकोमाची वेळेवर ओळख होण्यासाठी आणि उपचारासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ९ जून रोजी खास तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यात सुप्रसिद्ध ग्लॉकोमा स्पेशालिस्ट डॉ. प्रियांका सिंग रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
ग्लॉकोमा म्हणजे डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम करणारा असा आजार आहे, जो सुरुवातीला कोणतीही लक्षणं न देता हळूहळू दृष्टी कमी करतो आणि योग्य उपचार न झाल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.
डॉ. प्रियांका सिंग यांनी मुंबईतून एमबीबीएस आणि डीएनबी नेत्ररोग (Ophthalmology) तसेच चेन्नईमधून ग्लॉकोमा फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यांना सुमारे ७ वर्षांचा अनुभव आहे आणि त्या सध्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
४० वर्षांवरील व्यक्तींनी, ज्या मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, कुटुंबात कोणाला ग्लॉकोमा झालेला आहे, किंवा ज्यांना चष्म्याचा नंबर आहे, त्यांनी ही तपासणी अवश्य करून घ्यावी. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्याने दृष्टी वाचवता येते. या शिबिरात सहभागी होण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि अपॉइंटमेंटसाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.



