रत्नागिरी शहर परिसरात ‘गांजा’सदृश अंमली पदार्थासह एकजण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अंमली पदार्थ विरोधी कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या अमली पदार्थ विरोधात मोहीम जोरदारपणे राबवली जात असून, या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. लक्ष्मण रवी नायर (वय ३४, रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून त्याच्याकडे ४७७ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळला. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात असून, त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करून त्यांच्यामार्फत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याबाबत अधिक सूचना दिल्या होत्या.
दिनांक ३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे-नाचणकर चाळ, रत्नागिरी परिसरामध्ये एका रिक्षा चालकाच्या संशयित हालचाली वरून त्याच्याकडे चौकशी केली असता हा इसम हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण रवी नायर (वय ३४, रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी) असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने त्याच्या ताब्यातील पिशवी, पंचांसमक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये ४७७ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळला. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात असून, त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 129/2025 एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम 8(क), 22(अ), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी लक्ष्मण नायर याच्या कडून ४७७ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ व एक ऑटो रिक्षा (क्रमांक MH08-AQ-1665) असे मिळून एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पो.हवा शांताराम झोरे, पो.हवा नितीन डोमणे, पो.हवा गणेश सावंत, पो.हवा प्रवीण खांबे पो.हवा सत्यजित दरेकर यांनी केली आहे.



