मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

जानवळे येथील एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळातर्फे गुणगौरव सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे येथील एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ व एकता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी ते पदवीधर अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २०२५ जानवळे येथील चिपळूणकर निवासस्थानी शंकर काशीराम चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.

कार्यक्रमाला कार्यकारणीतील सदस्यांबरोबरच नागरिक  उपस्थित होते. यावेळी ५३ मुलांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर महिलांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी यावेळी शंकर चिपळूणकर, सुधीर कोंडविलकर, दत्ताराम कोंडविलकर विश्वनाथ कोंडविलकर, संजय कोंडविलकर, संदीप कोंडविलकर, मंगेश कोंडविलकर, दिनेश चिपळूणकर, योगेश चिपळूणकर, जितेंद्र कोंडविलकर, सुभाष कोंडविलकर, किशोर चिपळूणकर, रामदास कोंडविलकर, राजेंद्र कोंडविलकर, रमेश कोंडविलकर, राजेश कोंडविलकर, सुरेश चिपळूणकर, राजेश मनोहर कोंडविलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!