कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात १३ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिर
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या मार्फत शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या वतीने रविवारी (१३ जुलै) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघ हॉल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी नागरिकांना विविध आरोग्य तपासणी सेवांचा लाभ घेता येणार आहे, ज्यात दंत चिकित्सा, गुडघे आणि सांध्यांची तपासणी, तसेच हिमोग्लोबिन (Hb) आणि जनरल आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.
हे शिबिर सर्वांसाठी खुले आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. कुवारबाव परिसरातील तसेच रत्नागिरीतील इतर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन यांनी केले आहे.
नागरिकांनी या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


