मुख्य बातमी
गोळप (रत्नागिरी) येथील श्री रामदरबार प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथील श्री रामदरबार प्रतिष्ठानतर्फे ३० ऑक्टोबर रोजी कै. अनंत रघुनाथ काळे स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाटणकर कार्यालय, फिनोलेक्स फाटा, गोळप, रत्नागिरी येथे ही स्पर्धा संपन्न होईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकांनी अविनाश काळे (९४२२३७२२१२) यांच्याकडे २८ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करायची आहे.



