Uncategorized

श्री दत्तप्रसादिक मित्र मंडळातर्फे आयोजित राधा-कृष्ण स्पर्धेत गार्गी बोरकर प्रथम

रत्नागिरी : अमित विलणकर पुरस्कृत गोपाळ काला उत्सवानिमित्त श्री दत्तप्रसादिक मित्र मंडळ, घुडेवठार यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य राधा-कृष्ण स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्र. १४ येथे केले होते. या स्पर्धेत गार्गी शैलेश बोरकरने प्रथम क्रमांक पटकावला.

रत्नागिरी तेली समाज सेवा संघ हॉल येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अमित विलणकर, भाई विलणकर, मुकुंद विलणकर, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा ढेकणे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, माजी नगरसेविका सत्यवती बोरकर उपस्थित होते.

या स्पर्धेत गार्गी शैलेश बोरकर, हर्ष प्रथमेश घुडे, मीत श्रीकार घुडे हे अनुक्रमे तीन विजेते ठरले. तर कबीर सुधेंदु घुडे, समर्था ओंकार भाटकर, विहान विजय तोडणकर आणि वीरा विजय तोडणकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून सौ. अपर्णा गोगटे, आसावरी पावसकर यांनी काम पाहिले.

यावेळी भाजप पदाधिकारी सचिनशेठ गांधी, सुरेंद्र घुडे, सचिन लांजेकर, सत्यवान बोरकर, विलास विलणकर, अशोक (बाबल) मयेकर, कमलाकर जोशी, सूरज बंटी जोशी, मनीष जोशी, मच्छिंद्र नागवेकर, अमित पावसकर, अमेय घुडे, जान्हवी घुडे, तृप्ती बोरकर, श्रेया घुडे, प्रतिभा नाखरेकर, साईराज घुडे, सुमित नागवेकर, प्रथमेश घुडे, सुमित नागवेकर, तेजस नाखरेकर, अमोघ पालकर, शैलेश बोरकर, अजय नाचणकर, निलेश कोतवडेकर, प्रवीण ढेकणे, तेजस घुडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!