मुख्य बातमी

‘नृत्यार्पण’ च्या ११ शिष्यांनी कोरले यशाचे शिखर

गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांना 'नृत्याविष्कार' आणि 'नृत्यविभूषण' पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या पॅरिस, फ्रांस येथील आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेशी संलग्न असलेल्या अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघाच्या १८ व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या शिष्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या अप्रतिम कामगिरीबद्दल गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांना ‘नृत्याविष्कार’ आणि ‘नृत्यविभूषण’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

मायनर गट : चौथे स्थान- देवेशी पांढोळे (मुंबई), तिसरे स्थान- ओवी साळवी (पनवेल), तिसरे स्थान- मीरा झगडे (रत्नागिरी). ज्युनियर गट : तिसरे स्थान- अनन्या डांगे (जर्मनी), दुसरे स्थान- शुभ्रा आंब्रे (कोतापूर), चौथे स्थान- धनश्री पवार (पनवेल), पहिले स्थान- : ओजस्वी बामणे (टिटवाळा), तिसरे स्थान- सानवी नरवणे (पावस). ओपन गट : चौथे स्थान- कृतिका जोशी (मुंबई), पहिले स्थान- श्रुती किल्लेकर (करंजाडी), दुसरे स्थान- पल्लवी राठोड (रत्नागिरी).

सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांच्या यशात मोलाची भर घातली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!