मुख्य बातमी

पोलीस, उत्पादन शुल्क आणि अन्न औषध प्रशासनाने कार्यवाही करावी

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देश

रत्नागिरी : पोलीस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अंमली पदार्थविरोधी तपासणीची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.

नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक १ सप्टेंबर रोजी झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक श्री. ढेरे यांनी ७ जुलैपासून अंमली पदार्थविरोधी केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. एकूण ९ गुन्ह्यांमध्ये ११ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ४.७१३.५ कि.ग्रॅ. गांजा असा एकूण ३ लाख ५८ हजार ९०० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केला. यात १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याबाबत निवडणूक कालावधित जशी चांगली कामगिरी केली आहे, तशी कामगिरी अंमली पदार्थाविरोधातही करावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृती करण्यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा. कोस्टगार्ड, पोलीस, अन्न व औषध प्रशासन अशा सर्वच विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने, कधी संयुक्तरित्या अंमली पदार्थविरोधात जोरदार तपासणी मोहीम राबवून कार्यवाही करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!