मुख्य बातमीराजकारण

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दामले विद्यालयात वह्या वाटप

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजपा) रत्नागिरी शहर मंडलाच्यावतीने रत्नागिरी नगरपालिका दामले विद्यालय शाळा क्रमांक १५ मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपूर्ण पंधरा दिवस वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरिबांना मदत, विविध सामाजिक संस्थांना मदत, वैद्यकीय मदत कॅम्प, असे अनेक कार्यक्रम भाजपाच्या वतीने राबवले जात आहेत.

नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालयमध्ये भाजपार्टीच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस निलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे यांनी संयोजन म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात कामगिरी केलेली विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी आपले मत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. व भाजपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपा सरचिटणीस निलेश आखाडे यांनी आपले मत व्यक्त करताना युती सरकारच्या माध्यमातून शाळेला नवीन इमारत मिळाली असून, शाळेसाठी इतर सोयी सुविधा प्राप्त होण्यासाठी व शाळेचा परिसर, आजूबाजूच्या परिसर सुशोभित करणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान असून शाळेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत हे पाहून आनंद वाटतो असे सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी भाजपा राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांचे कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत असत असल्याचे सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, संदीप सुर्वे, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा नूपुरा मुळ्ये, जिल्हा सचिव भक्ती दळी, शहर कोषाध्यक्ष सोनाली आंबेकर, कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा टाकळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, सोनाली केसरकर, भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, सचिन गांधी, नरेंद्र कदम, संतोष सावंत , नितीन गांगण, प्रीती शिंदे, निशा आलीम, प्रसाद बाष्टे, नरेंद्र कदम, निशा अलीम, संतोष सावंत, मंदार भोळे, तुषार देसाई आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!