अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याबद्दल भाजपाकडून मुख्याधिकारी गारवे यांचे अभिनंदन

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी शहरांमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे काम नगर पालिकेकडून सुरू आहे. कोकणनगर परिसरातील काही बांधकामे, साळवी स्टॉप जलतरण तलाव येथील काही अनधिकृत बांधकामे नगर पालिकेकडून तोडण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली कारवाई यासाठी भाजपाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच रत्नागिरी शहरातील अन्य ठिकाणी असणारे अनधिकृत बांधकामे याबाबत देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली. व अन्य अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करा. आणि हीच भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे असे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनाली केसरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, नितीन जाधव, राजेंद्र पटवर्धन, सचिन गांधी, राजू भाटलेकर, शैलेश बेर्डे, प्रज्ञा टाकळे, केतन कडू, संतोष सावंत आदी उपस्थित होते.



