मुख्य बातमी

रत्नागिरीकरांचे स्वप्न आता वास्तवात : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी विमानतळाची केली पाहणी

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीकरांचे रत्नागिरी विमानतळावरून उड्डाण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. शेतकरी बांधवांची मुले-मुली शिक्षणासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला कमी खर्चात प्रवास करू शकतील, हीच आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. आगामी सहा महिन्यांत हे अत्याधुनिक विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होईल. हा ऐतिहासिक क्षण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, अशी विनंती मी केली असून लवकरच त्यासाठी स्वतः भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दिली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकारांसमवेत रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणी केली. टर्मिनल बिल्डिंगचे काम सध्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले असून, सर्व अधिकारी व कंत्राटदारांसह चर्चा करून ३१ मार्चपर्यंत टर्मिनल बिल्डिंग आणि टॅक्सीवे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री सामंत यांनी दिले. यावेळी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “या विमानतळाच्या बांधकामात बांबू आणि लाकूड यांचा अभिनव वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरकता आणि ऑक्सिजन वाढ यासारख्या संकल्पनांना चालना मिळेल. महाराष्ट्रातील हे पहिले असे विमानतळ ठरणार आहे, जे इतर विमानतळांसाठीही आदर्श ठरेल.”

यावेळी पालकमंत्री सामंत यांनी हे विमानतळ नेमके कसे असेल, यात काय सुविधा असतील याबाबतची सविस्तर माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!