मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध

खेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय प्रारूप मतदारयाद्या आज (८ ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. मतदार यादीबाबत मतदारांना हरकत अगर सूचना असल्यास १४ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात पुराव्यासह दाखल कराव्यात, असे आवाहन खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी आवाहन केले आहे.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदार यादी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत तहसीलदार कार्यालय, खेड व पंचायत समिती कार्यालय, खेड येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

मतदार यादीबाबत मतदारांना हरकत अगर सूचना असल्यास ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील १६ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार निश्चित करून देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात आवश्यक पुराव्यासह तहसीलदार कार्यालय, खेड येथे दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!