गुहागर तालुका (मुंबई विभाग) प्रवाशी संघटनेची मुंबई कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी भरत भुवड, तर सचिवपदी अनिल भुवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका मुंबई विभाग प्रवासी संघटनेची (मुंबई) २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. गुहागर तालुका प्रवाशी संघटना ग्रामीणचे तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी नुकतीच याची घोषणा केली.
गुहागर तालुका मुंबई विभाग प्रवासी संघटना मुंबई कार्यकारणी मंडळाच्या अध्यक्षपदी भरत भुवड, कार्याध्यक्षपदी ॲड. राजेंद्र पवार, उपाध्यक्षपदी लूवू रघुनाथ राऊत, संजय कळंबटे, रघुनाथ घुमे, सचिवपदी अनिल भुवड, सहसचिवपदी संतोष फटकरे, डी. एम. चोंगले, राजेश खेडेकर, खजिनदारपदी श्रीकांत कातकर, सहखजिनदारपदी मनोहर घुमे यांची निवड घोषित केली आहे.
कार्यकारणी सदस्य पदी सुरेश गिज, उदय दणदणे, प्रशांत दणदणे, नवनाथ भुवड, अंनत सुवरे, संजोग कांबळे, संदेश हुमणे, महादेव बेंडल, देवेंद्र पवार, राजू वीर, चंद्रकांत पारदळे, संतोष नितोरे, रमेश भेकरे, मंगेश किजबिले, सुमित भोजणे, सुनील घाणेकर, योगेश कदम, सुशील आग्रे, दिलीप किलबिले, स्नेहा पवार, गीता सोलकर आदी पदाधिकारी यांची गुहागर तालुका प्रवासी संघटना ग्रामीणचे तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी कार्यकारणीची घोषणा केली आणि सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


